पुन्हा एक “प्रतिक्रांती” आणि आपण….

270

खुप दिवसांपासून मनामध्ये एक प्रश्नाने घोळ घातलाय कि,२००० वर्षांपूर्वी हा देश बौद्धमय होता (ब्राम्हण सेनापती पुष्यमित्र शृंगाने शेवटचे मौर्य सम्राट बृहद्रथ यांची हत्या केली तोपर्यंत) मात्र अचानक असे काय झाले कि इथे अचानक ब्राम्हण धर्म स्थापन झाला. त्यावेळीही भारताची लोकसंख्या काही करोडमध्ये असेलच नं… मग मूठभर ब्राम्हण जेव्हा भिक्षुंची कत्तल करित होते तेव्हा त्यांच्या आणि संरक्षणार्थ कोणीही पुढे कसे आले नाही. इथून पूर्ण बौद्ध धम्मच नामशेष होईपर्यंत सर्व कसे हातावर हात धरून शांतच बसून राहिले?. आणि त्यानंतर २००० वर्ष येथील वर्णव्यवस्थेचे गुलाम बनून निमूटपणे कसे जगलेत. (मधल्या काळात काहींनी विद्रोह केला तो अपवाद वेगळा)

भिख्खुंचे शिर आणा आणि सुवर्ण मुद्रा मिळवा,येथील विश्वविद्यालये जाळण्यात आले, विहारांची आणि मुर्त्यांची तोडफोड करण्यात आली,जे तोडणे अशक्य होते त्यांचे विद्रुपिकरण केल्या गेले अथवा मंदिरांमध्ये रूपांतरित करण्यात आले.हे सर्व एवढ्या सहजपणे कसे शक्य झाले?.हे सर्व एवढ्या सहजपणे कसे शक्य झाले हे आजची आपली आपल्या समाजाप्रती भुमिका बघून सहज स्पष्ट होते.१) संविधान जाळण्यात आले.२) सवर्णांना १० टक्के आर्थिक आरक्षण लागू करुन पुढील काळात SC,ST,OBC चे संवैधानिक आरक्षण आर्थिक कक्षेत आणण्याची सुरूवात केल्या गेली.३) १३ Point roster लागू करुन येथून पुढील १०० वर्षांत एकही बहुजन प्राध्यापक होणार नाहि याची तजवीज केल्या गेली.४) आणि सर्वात महत्वाचे EVM आणून त्या माध्यमातुन आधुनिक मनुस्मृती लागू केल्या जात आहे.FDI,SEZ,लागू केल्या गेला,सर्व शासकीय विभागांचे खाजगीकरण करुन आरक्षण संपविल्या जात आहे. जिल्हा परिषद शाळा बंद करुन ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था संपुष्टात आणली जात आहे.असे कितीतरी मुद्दे आहेत ज्यामध्यमातुन हे स्पष्ट होते कि आज आपण प्रतिक्रांतिच्या उंबरठ्यावर उभे आहोत.

तरीसुद्धा आपण याविरुद्ध लढा देण्यास तयार नाहीत. बरेचसे आपल्यातील लोक दलाली करण्यातच मग्न आहे अथवा संवैधानिक बाबींचा फायदा घेवुन सुखाचे जीवन जगण्यातच धन्यता मानत आहेत.हीच परिस्थिती पुष्यमित्र शुंगाच्या वेळेसही घडली असेल,त्यावेळीही अशेच काही दलाल असतील जे त्याला जाऊन मिळाले असतील आणि इतर लोक केवळ तमाशा बघत बसले असतील जसे आज बहुतांश लोक करीत आहेत.आज जर आपण ज्या समाजाचे प्रतिनिधी म्हणून एवढे अधिकार लाटले त्या समाजाच्या अधिकार रक्षणासाठी पुढे आलो नाही आणि आपणास याचे काय हा विचार करित बसलो तर एवढे लक्षात असू द्या जे आज सुपात आहेत तेसुद्धा उद्या जात्यात जाणारच आहेत,तेव्हा संविधान रक्षणासाठी पर्यायाने स्वतःच्या भावी पिढ्यांसाठी या संघर्षात सामील व्हा अन्यथा प्रतिक्रांतीतिल किड्या मुंग्या सारखे गुलामीचे जीवन जगण्यासाठी मनाची तयारी करुन घ्या.

लेखक : भन्ते शाक्यपुत्र राहुल (पैठण)

संपर्क : 9834050603