RPI चे नागालँडमध्ये आमदार निवडून आले, मग महाराष्ट्रात का नाही ? कार्यकर्त्यांनी निवडून येण्यासाठी काम करावे – रामदास आठवले

प्रकाश आंबेडकरांनी माझ्या सोबत भाजप कडे यावे त्यामुळे समाजाला सत्तेचा मोठा लाभ मिळवून देता येईल - रामदास आठवले

365

मुंबई दि. 29 – महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा तळागाळातील अन्यायग्रस्त अनुयायांना न्याय मिळवुन देणारा एकमेव पक्ष म्हणजे रिपब्लिकन पक्ष. आम्ही ज्यांच्या सोबत उभे राहिलो तो पक्ष सत्तेत येतोच मग तो काँग्रेस असो वा राष्ट्रवादी, रिपाइं फक्त सत्ते बरोबर जाणारा पक्ष नसुन तर सत्ता हस्तगत करणारा पक्ष आहे. ही किमया फक्त आणि फक्त रिपाइं पक्षातच आहे. सद्याच्या भाजप सरकारमध्येही रिपाइंची महत्वाची भुमिका आहे.नागालँड मध्ये रिपब्लिकन पक्षाचे 2 आमदार स्वबळावर निवडून आले.मग महाराष्ट्रात आर पी आय चे आमदार का निवडुन येऊ शकत नाहीत. कार्यकर्त्यांनी आपले आमदार निवडून येण्यासाठी शिस्तबद्ध काम करावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

शिर्डी येथे आयोजित रिपाइंच्या राष्ट्रीय अधिवेशनाप्रसंगी रामदास आठवले बोलत होते. विचारमंचावर महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील होते. रिपाइं चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे; राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; नागालँड चे आमदार एमटी चोबा; लिमा ओनन चँग; राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम; राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; सौ.सिमाताई आठवले, जित आठवले, युवक आघाडीचे राज्य अध्यक्ष पप्पू कागदे; डॉ विजय मोरे महिला आघाडीच्या राज्य अध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे; सूर्यकांत वाघमारे; रमेश मकासरे; अशोक गायकवाड; संघमित्रा गायकवाड; जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे; विनोद निकाळजे; शिलाताई गांगुर्डे; ऍड.आशाताई लांडगे; विजय वाकचौरे; श्रीकांत भालेराव; जील्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, भिमा बागूल, सुनील साळवे, पप्पु बनसोडे, दीपक गायकवाड ; धनंजय निकाळे, राजेंद्र पाळंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे किंवा इतर ठिकाणी न जाता माझ्या सोबत भाजप कडे यावे. आम्ही दोघांनी ही भाजप शी युती केल्यास आपल्या समाजाला त्यातुन सत्तेचा मोठा लाभ मिळवून देता येईल असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

रामदास आठवले पुढे म्हणाले की, मी येथे हार तुरे घेण्यासाठी आलो नाही तर पक्षाचे ध्येय धोरणं राबविण्यासाठी आलो आहे. आज आपल्याला चिंतन करण्याची गरज आहे.पुष्पहार घालून क्रांती होत नाही. नागालँड मध्ये रिपाइंचे 2 आमदार निवडुन येतात मग महाराष्ट्रात का नाही? याचे आत्मचिंतनही कार्यकर्त्यांने करणे गरजेचे आहे.

महामानव डॉं. बाबासाहेब आंबेडकरांचे ख-या अर्थाने विचार रुजवायचे असतील तर स्वयंशिस्त महत्वाची आहे. ते पुढे म्हणाले आज झालेल्या नविन संसद भवनाचे उद्घाटन हा ऐतिहासिक क्षण आहे. या वास्तुमुळे देशाच्या वैभवात भर पडली आहे असे गौरउद्गार रामदास आठवले यांनी काढले.

यावेळी बोलतांना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, आपल्या सर्वांचे नेते रामदास आठवले राजकारणात मैत्री जपणारे व्यक्तीमत्व आहे. त्यांचा पिंड संघर्षाचा आहे. एन.डी.ए. मधून अनेक पक्ष बाहेर पडले, पण जनतेच्या विकासासाठी रामदास आठवले बाहेर पडले नाही. स्वाभीमानाने राहिले. कार्यकर्त्यांनी त्यांना शिर्डी मधून निवडून आणण्याची काळजी करु नये. त्यासाठी भाजप सक्षम आहे. इंदू मीलमध्ये उभारण्यात आलेले डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक सर्व समाजाला समर्पित आहे. या स्मारकातून बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेणा-या अनेक पिढया घडतील.असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

रिपाइं चे अन्य राज्यांतील पदाधिकारी दिल्ली चे माजी मंत्री संदीप कुमार; हरियाणा चे सोनू कुंडली; वेंकट स्वामी ( कर्नाटक) ; ब्रह्मानंद रेड्डी( आंध्र प्रदेश) नागेश्वराव गौड; रवी पसूला; गोरख सिंग ( तेलंगणा) उषा आफळे ( छत्तीसगड) राजस्थान चे ऍड. नितीन शर्मा; आरती बेहरा अनिल सिंग ; आदी उपस्थित होते.