राफेल प्रकरणाचा पूर्ण अभ्यास कडून सत्य जनतेसमोर मांडेन, अण्णांची घोषणा

811

अहमदनगर : नरेंद्र मोदी सरकारने फ्रान्ससोबत केलेल्या राफेल विमान करारामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस कडून करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात प्रत्येक दिवसागणिक नवीन आरोप प्रत्यारोप होत असून, राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली विरोधीपक्षांकडून केंद्र सरकारवर आरोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही राफेल प्रकरणामध्ये उडी घेतली आहे. राफेल प्रकरणाचा पूर्णतः अभ्यास करून, याबाबतचे सत्य मी जनतेसमोर आणेण अशी घोषणा अण्णा हजारे यांनी केली आहे.

अण्णा हजारे हे येत्या 30 जानेवारीपासून लोकपाल व अन्य मागण्यासाठी आंदोलन करणार आहेत.