जलसंधारण अधिकाऱ्याला साडेआठ लाखांची लाच घेताना एसीबीने केली अटक.

222

औरंगाबाद – जिल्ह्यात लाच लुचपत विभागाने सर्वात मोठी कारवाई केली आहे. जलसंधारण विभागातील अधिकाऱ्याला साडेआठ लाखांची लाच घेताना एसीबीने अटक केली आहे. ऋषिकेश देशमुख (उपविभागीय अधिकारी वैजापूर जलसंधारण विभाग) असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ऋषिकेश देशमुख हे जलसंधारण विभागात वैजापूर येथील उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. जलसंधारण विभागातील एका कामाची टक्केवारी म्हणून, त्यांनी तक्रारदार यांच्याकडे लाच मागितली होती. दरम्यान एसीबीने लावलेल्या ट्रॅपनुसार, देशमुख यांना साडेआठ लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे.