आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर औरंगाबाद मध्ये दगडफेक.

151

औरंगाबाद : आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेसाठी औरंगाबाद येथे आले आहेत. शिंदे विरूद्ध ठाकरे गटाच्या वाकयुद्धा दरम्यान काल औरंगाबाद दौर्‍यात आदित्य ठाकरेंच्या गाडीसमोर काही जणांनी गोंधळ घातल्याची घटना समोर आली. यावेळेस आदित्य च्या गाडीवर दगडफेक झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम आणि मात रमाईंची मिरवणूक एकावेळी सुरु झाली होती. अशावेळी रमाईंची मिरवणूक थांबवल्यानं किरकोळ दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे.