वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात; 31 जखमी, 8 गंभीर..

133

चंद्रपूर : नामकरणविधीसाठी गावकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा अपघात झाल्याने 31 जण जखमी झाले, यापैकी आठ जण गंभीर आहेत. ही घटना ब्रम्हपुरी येथील टिळक नगर जवळ घडली. वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले. गंभीर रुग्णांना चंद्रपुरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे तर इतरांवर ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.