Disha Salian: दिशा सालियन मृत्यू प्रकरण: विधानसभेत प्रचंड मोठा गदारोळ; एसआयटीमार्फत चौकशी; देवेंद्र फडणवीसांची घोषणा.

144

दिशा सालियन प्रकरणावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला आहे. त्यामुळे सभागृह तीनवेळा तहकूब करण्यात आले. दिशा सालियनच्या मृत्यूवेळी तिच्या घरी कोणता नेता होता याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणे आणि भरत गोगावले यांनी ही मागणी केली. त्यानंतर दिशा सालियन प्रकरणांची एसआयटीमार्फत (Special Task Force) चौकशी करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी आज विधानसभेत केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, दिशा सालियन मृत्यू प्रकरणी पोलिसांकडे केस सुरु आहे. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे याचे पुरावे आहेत त्यांनी ते द्यावे. शिंदे गटाच्या आरोपांनंतर आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray) अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राहुल शेवाळेंच्या वक्तव्यानंतर शिंदे सरकार आक्रमक झाले आहे, सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सॅलियन आत्महत्या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल केंद्राकडून मागवणार असून महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) पुन्हा तपास करण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार आहे. दिशा सालियन मृत्यूचा मुद्दा भरत गोगावलेंकडून विधानसभेत उपस्थित करण्यात आला. मृत्यूआधी दिशासोबत कोण कोण होतं? दिशाच्या मृत्यूचं गूढ कधी उकलणार? असा सवाल गोगावलेंनी सभागृहात उपस्थित केला.