सोलापूर पुनर्वसन भ्रष्टाचाराचे निघाले विधानसभेत धिंडवडे; मुख्यमंत्र्याचे कारवाईचे आश्वासन; दिपक चंदनशिवे यांच्या पाठपुराव्याला यश..

173

नागपूर : जिल्हा पुनर्वसन अधिकारी, सोलापूर यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये कोयना, धोम, कन्हेर, वीर अशा विविध धरणाखालील धरणग्रस्तांना दलालामार्फत जमिनी मंजूर करुन त्या जमिनींची दलालामार्फत खरेदी-विक्री केल्याप्रकरणी गैरव्यवहाराबाबत आज भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार प्रा. राम शिंदे यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. यावर सविस्तर चर्चा झाली असून खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोकशी अंती दोषींवर कठोर कारवाई करू असे आश्वासन दिले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) राज्य संघटक सचिव दिपक चंदनशिवे यांनी केलेल्या तक्रारी आंदोलन, पाठपुराव्याला यश मिळताना दिसून येत आहे.

तत्कालीन जिल्हा पुनर्वसन अधिकारी, सोलापूर यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये कोयना, धोम, कन्हेर, वीर अशा विविध धरणाखालील धरणग्रस्तांना दलालामार्फत जमिनी मंजूर करुन त्या जमिनींची दलालामार्फत खरेदी-विक्री केल्याप्रकरणी गैरव्यवहाराची चौकशी करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत RPI (A) चे राज्य संघटक सचिव दिपक चंदनशिवे यांनी आझाद मैदान, मुंबई येथे हिवाळी अधिवेशन २०२१ च्या दरम्यान केलेल्या आंदोलनाच्यावेळी शासनाने दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असूनही अद्याप दोषींवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे माहे नोव्हेंबर, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, असा प्रश्न आमदार प्रा. राम शिंदे यांनी सरकारला विचारला.

तत्कालीन पुनर्वसन अधिकारी, सोलापूर यांच्या गैरकारभाराची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी वारंवार शासनाकडे केली आहे. तरी देखील सरकारकडून दोषी अधिकाऱ्यांवर अद्यापही कारवाई का केली नाही असा प्रश्न प्रा. राम शिंदे यावेळी विचारला.

आमदार प्रा. राम शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नांना सत्ताधारी पक्षाकडून पुढीलप्रमाणे उत्तर देण्यात आले. सोलापूर जिल्ह्यात विविध प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनी वाटप करण्यात आलेल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनी वाटपासंदर्भात दिपक चंदनशिवे यांनी दिलेल्या निवेदनातील मुद्यांच्या अनुषंगाने तपासणी करण्यासाठी विभागीय आयुक्त, पुणे यांच्या कार्यालयाकडून चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्यानुसार सदर निवेदनातील आरोपांमध्ये सकृत दर्शनी तथ्यता दिसून येत आहे. त्यामुळे सखाराम हरी कदम यांना दुबार जमीन वाटप व वाडकर यांना पर्यायी जमीन वाटप आदेश या दोन्ही प्रकरणी वाटप आदेश रद्द करण्यात आले असून यासंदर्भात संबंधितांविरुध्द विभागीय चौकशी प्रस्तावित होती. त्यानुसार तत्कालीन जिल्हा पुनर्वसन अधिकारी, सोलापूर तसेच तत्कालीन मंडळ अधिकारी यांच्याविरुध्द विभागीय चौकशी सुरु करण्यात आलेली आहे.

चर्चेदरम्यान सत्ताधारी पक्षाकडून मंत्री संदीपान भुमरे यांनी उत्तर दिले. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे आणि काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी सरकारला धारेवर धरले. त्यामुळे यावर तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करत येत्या २ महिन्यात चोकशी पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन सभागृहाला यावेळी दिले.

मौजे चळे, ता पंढरपूर येथील शासकीय जमीन गट क्र 592/2 आणि गट क्र598/1शेतजमीन दुबार बोगस कागदपत्रे तयार करून पुनर्वसन उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण, सर्कल, दलाल, एजंट नितीन दादासाहेब बाबर यांना सखाराम कदम, वाडकर यांच्या नांवे बोगस कागदपत्रे च्या आधारे काढून श्री नितीन दादासाहेब बाबर या दलालांच्या नावे खरेदी केली परंतू या दोन्ही गट क्र 592/2व598/1 हे क्षेत्र नव्याने कालवा संपादित दाखवून गट क्र 592/2 वर 29लाख 42 हजार 420 रपये व गट क्र 598/1 यावर 34 लाख 33 हजार 855 रुपये चा धनादेश क्र 21423 दि 18.8.2021 रोजी I D B I बँक शाखा पंढरपूर येथे वटवला आहे एकूण 53लाख 76 हजार 235 रपये वसूल केली अद्याप का केली नाही त्यामुळे खातेनिहाय चौकशी पुढे करुन संबधित अधिकारी कर्मचारी व दलाल याच्यावर निलंबनाची कारवाई करुन फोजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत अशी मागणी दिपक चंदनशिवे यांनी केली आहे.