औरंगाबाद खून प्रकरण : वंचित कडून तीव्र निषेध, पोलिसांनी राजकीय दबाव झुगारून आरोपींना शासन करण्याची मागणी…

760

Mumbai : औरंगाबाद शहरातील मनोज शेषराव आव्हाड ह्या गरीब दलित तरुणाचा काही विकृत मानसिकतेच्या लोकांनी अमानुष मारहाण करून खून केला. युवा प्रभाव ने ही बातमी प्रकाशित केली. त्यामुळे सगळीकडेच असंतोष पसरला. सर्वच थरातून ह्या घटनेचा निषेध होवू लागला आहे. मात्र ह्या घटनेतून हे स्पष्ट झाले आहे की Mob लिंचींग सारखे अमानुष प्रकार आता महाराष्ट्रात देखील घडू लागले आहेत.

वंचित बहुजन आघाडीकडून ह्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला असून पोलिसांनी राजकीय दडपणाखाली न येता या प्रकरणाचा तपास करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

औरंगाबाद शहरातील शिवसेनेच्या माजी नगरसेविकेच्या मुलांसह काही तरुणांनी सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या मनोज शेषराव आव्हाड या तरुणास चोरीच्या संशयावरून जीवघेणी बेदम मारहाण केली आणि त्यात त्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना तातडीने कठोर शिक्षा सुनावण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी केली आहे.

आरोपी हे सत्ताधारी शिवसेना पक्षाशी संबंधित आहेत. पोलिसांनी राजकीय दडपणाखाली न येता या प्रकरणाचा तपास करावा असे आवाहन सिद्धार्थ मोकळे यांनी केले आहे.

झालेली घटना अमानवीय व निषेधार्य आहे, पण या घटनेला कोणीही जातीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये अशी विनंती त्यांनी केली असून आव्हाड कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी असल्याची माहिती मोकळे यांनी दिली आहे.