महाराष्ट्राच्या मदतीसाठी कर्नाटक सरसावले, मुख्यमंत्री येडियुरप्पांनी घेतला अलमट्टी धरणातील विसर्ग वाढवण्याचा निर्णय.

689

कोल्हापूर : पावसामुळे सांगली-कोल्हापूरमध्ये महापूर आला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकार आता सक्रिय झाले आहे. केंद्राच्या हस्तक्षेपानंतर कर्नाटकातील ‘अलमट्टी’ धरणातून विसर्ग वाढवण्याचा निर्णय कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी घेतला आहे. हा विसर्ग दोन लाखांहून पाच लाख क्यूसेक करण्यात आला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा या दोघांनाही फोन केल्याचे फडणवीसांनी सांगितले. पूरग्रस्त भागाचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली.