पंच कमिटी आणि गाव पुढाऱ्यांचे प्रताप…

425

वारंवार अपप्रचार करणे, जोर जबरदस्तीची भाषा करणे, गावात मीटिंग घेणार, गाव जमवणार, हे आता चालणार नाही. आणि खपवून पण घेणार नाही. गावाच्या विकासासाठी, भल्यासाठी ग्रामसभा घेणार नाहीत, मात्र गोरख बाळू कांबळे चा विषय आला की, गाव जमवणार. असे कसे चालणार.?

श्री म्हसोबा मंदिराचा पिढ्या न पिढ्या असलेला रस्ता आजही आहे, मंदिराची वेस त्याच रस्त्याला आहे. पायऱ्या त्याच रस्त्याला आहेत. देवाची पालखी देखील त्याच रस्त्याने जाते येते. मग मी रस्ता कसा अडवला.? मी १० वर्षे अडवणूक केली असा प्रचार करणाऱ्यांनी माझ्या कुटुंबाला ५० वर्षे कसे फसवले याचा जाब कोण विचारणार. भरवणार का ग्रामसभा ह्या विषयावर.? जमवणार का गाव ह्या विषयावर?  ज्या पंच कमिटीने, ज्या पुढाऱ्यांनी आम्हाला फसवले, विचारणार का त्यांना जाब..?

कोण कुणाच्या जमिनीत वितभर जागा सोडत नाहीत, आणि तुम्ही माझ्या कडून हातभर जागेचे अपेक्षा का करताय? त्यामुळे एक घर काय करतंय? असं म्हणणाऱ्यानी आगीशी पंगा घेवू नका. तुमच्या कारनाम्याच्या सर्व नोंदी ठेवतोय. हे लक्षात ठेवा

आज त्या त्या वेळच्या पंच कमिटी आणि गाव पुढाऱ्याचा प्रतापाचा पाढा खाली मांडतोय..

१) मोहन बाळू कांबळे यांना नोकरीला लावतो म्हणून माझे वडील बाळू बापू कांबळे यांना फसवून जमीन घेतली. कुठंय  नोकरी ? याचे उत्तर कोण देणार?

२) देवासाठी रस्ता द्या, दोन एकर जमीन देतो. जबरदस्तीने रस्ता केला. दोन एकर जमीन कुठंय?

३) अडीज वर्षासाठी सरपंच पदाचे आमिष दाखवून रस्त्याची मागणी केली.

४) निवडणुकीची वेळ आल्यावर तहसीलदार कार्यालयातून माझी आणि माझ्या पत्नीची मतदार यादीतून नावे वगळण्यासाठी प्रयत्न केले.

५) ह्या वर्षी श्रावण महिन्यात मी आयोजित केलेल्या महाभंडारा कार्यक्रमासाठी कुणीही आले नाही. आणि पंच कमिटीने गावात कार्यक्रमाला कुणी जावू नका असा प्रचार केला. काय कारण असावे.?.याबद्दल सविस्तर लिहणार.

आपला

गोरख (बापू) बाळू कांबळे

संस्थापक /अध्यक्ष

श्री खडीचा म्हसोबा मंदिर संस्थान. (नियो)

अलकुड (एस), तालुका: कवठे महांकाळ