अग्रलेख | माज – मिजास – मागास..

253

आजमितीला महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषयाने जोर धरला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची सर्व सूत्रे ताब्यात घेतली आहेत. आंदोलन, उपोषण, चर्चा, सरकारी पातळीवर हालचाली जोरात सुरू आहेत. मराठा आरक्षण भेटेल? ते कोर्टात टिकेल ? हे विषय देखील आहेतच या कायदेशीर बाबीवर मंथन सुरू आहे. यावर सद्य परिस्थितीत बोलायला नको, तर आज आपण माज – मिजास – आणि मागास ह्या विषयावर चर्चा करू.

काही मराठा तरुणांकडून समाज माध्यमांवर रिल्स, स्टेटस्च्या माध्यमातून बौद्ध समाजाविषयी निंदनीय आणि अनावश्यक टिपण्णी होत आहे. घोडा, गाढव, २ किलो गहू, तांदूळ, रेशन असे बरेच काही. काहींनी तर मनोज जरांगे पाटील यांची तुलना थेट महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी करून अकलेचे तारे तोडले. या सर्व बाबीतून तुमचा माज आणि मिजास दिसून येतो असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात आरक्षणाची तरतूद करून हजारो वर्षे गुलामगिरीत जगणाऱ्या समाजाला मुख्य प्रवाहात आणले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा मंत्र आपल्या अनुयायांना दिला. बौद्ध समाजाने कायमच भारतीय संविधान आणि आरक्षणाचे रक्षण केले. उपेक्षा सहन केली, अन्याय, अत्याचार सहन केला. ओबीसी बांधवांच्या न्याय हक्कासाठी मंडल कमिशन वेळेला जातीयवादी व्यवस्थेला थेट भिडणारा बौद्ध समाज होता. देशभरात बौद्ध समाजाला टार्गेट करण्यात आले. जातीय दंगली उसळल्या त्यावेळी ओबीसी बांधवांसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी बौद्ध समाज रस्त्यावर निळा झेंडा घेवून उभा होता. वंचित घटकांसाठी बौद्ध समाजाने अनेक लढे उभारले,

आताही जेंव्हा मराठा आरक्षणाचा विषय समोर आला तेंव्हा बौद्ध समाजाचे प्रमुख आणि मोठे नेते रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर आणि इतर सर्व नेत्यांनी मराठा आरक्षण मागणीला पाठिंबा दिला. बौद्ध समाजाने देखील मराठा आरक्षण मागणीला विरोध केला नाही. मात्र तरीही काही मराठा तरुणांकडून बौद्ध समाजाविषयी द्वेष पसरवले जात आहेत. या मागची षडयंत्र शोधली पाहिजेत. मराठा – दलित हा संघर्ष तुम्हाला निर्माण करायचा आहे का? की हाच तो माज आहे जो जाता जात नाहीय.

बौद्ध समाजातील काही तरुण आणि समजदार नेते म्हणतात की, हे जे कोणी घोडा, गाढव रिल बनवणारे आहेत ते आरएसएस प्रणित लोक आहेत. म्हणून त्याकडे दुर्लक्ष करा. खरेच हे नेते खूप समन्वय साधणारे नेते आहेत. जातीय सलोखा बिघडू नये म्हणून काम करणारे नेते आहेत. त्यांचे अभिनंदन. असाच सलोखा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मंडळी राखतील का? आपल्या उत्साही कार्ट्याना समज देतील का?

कुणी काहीही म्हणा, माज – मिजास सोडून जोवर मागास सिद्ध होणार नाहीत तोवर काहीच प्राप्त होणार नाहीं. जे समर्थन तुम्हाला मिळत आहे ते देखील मिळणार नाही याचे भान ठेवा म्हणजे झाले.

प्रफुल गोरख कांबळे

Editor –In- Chief : www.YuvaPrabhav.com

Email : kampraful@gmail.com

(आपण आपल्या प्रतिक्रिया वरील मेल वर पाठवू शकता. लेखातील मुद्दे आवडल्यास लाईक आणि शेयर करा. जेणेकरून लेखप्रपंच सार्थकी लागेल…)

www.YuvaPrabhav.Com हे एक स्वतंत्र मराठी वेब न्यूज पोर्टल आहे. Google Play Store वरून YuvaPrabhav चे मोबाईल application डाऊनलोड करा. आम्हाला ट्विटर, फेसबुक वर फॉलो करा. WhatsApp News group मध्ये सामील व्हा. ही विनंती

. – आपला प्रफुल कांबळे.