खलिस्तानी समर्थकांचा भारतीय दूतावासावर हल्ला; जाळपोळ करण्याचा प्रयत्न.

233

अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को शहरातील भारतीय दूतावासावर हल्ल्याची घटना घडली आहे. अमेरिकेच्या स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी 1.30 ते 2.30 च्या दरम्यान हा हल्ला झाला.

रिपोर्टनुसार, आगीमुळे फारसे नुकसान झाले नसल्याचे अहवालात म्हटले आहे. या हल्ल्यात एक कर्मचारी जखमी झाला. खलिस्तानी समर्थकांनी या घटनेचा व्हिडिओही जारी केला आहे. मात्र अद्याप भारतीय दूतावासाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.