राज्यातील रुग्णालयांत मृत्यूचे तांडव; नांदेडनंतर आता छत्रपती संभाजी नगरमध्ये 8 रुग्णांचा मृत्यू..

96

संभाजी नगर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील रुग्णालयांमध्ये मृत्यूची मालिका सुरूच आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 36 तासांत 31 मृत्यूंनंतर आता छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) घाटी रुग्णालयात 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. औरंगाबादच्या घाटी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेल्या 8 जणांमध्ये 2 नवजात बालकांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

याआधी नांदेड येथे सोमवारी रात्री 24 तासांत 12 नवजात बालकांसह 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. यानंतर, रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तज्ञांचे एक पथक पाठविण्यात आले. मात्र, दरम्यान, पुढील 12 तासांत 4 मुलांसह आणखी 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.