रोहित पाटील, सुमन पाटील यांचं उपोषण मागे; राज्य सरकारकडून मागण्या मान्य.

109

सांगली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत पंतप्रधान आर आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील टेंभू पाणी योजनेच्या विस्तारीकरणासंबंधित मागण्यांसाठी उपोषणाला बसले होते. आज राज्य सरकार कडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी आमरण उपोषण मागे घेतले आहे.

रोहित पाटील यांच्यासोबत त्यांच्या आई आणि आमदार सुमनताई पाटील ह्या देखील उपोषणाला बसल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर आणि सांगलीचे जिल्हाधिकारी यावेळी उपस्थित होते.

सांगलीच्या तासगावामधील गावांना पाण्यासाठी एका महिन्यात प्रशासकीय मान्यता देऊ असे आश्वासन फडणवीसांनी रोहित पाटील यांना दिलं आहे. तासगाव तालुक्यातील 8 आणि कवठेमंहाकाळ तालुक्यातील 9 गावांचा टेंभू योजनेत सहभागी व्हावा. तसेच या टेंबू प्रकल्पाला सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळावी अशी त्यांची मागणी आहे. जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी एक महिन्यात सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचे लेखी पत्र जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्याकडून आमदार सुमनताई पाटील यांच्याकडे देण्यात आलं आहे. या विस्तारीत योजनेसाठी 8 टी.एम.सी. पाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यामुळे खानापूर,आटपाडी व विसापूर सर्कल तासगाव तालुक्यातील 34 गावांना त्याचा लाभ होणार आहे.