पंच कमिटीने नसत्या उचापत्या थांबवा, अखेरचा इशारा.

617

मी गोरख बाळू कांबळे, गावातील पंच कमिटी ला अखेरचा इशारा देत आहे. ग्रामपंचायत पंच कमिटीने गावाच्या भल्यासाठी कार्य करावे. विकासासाठी कार्य करावे. नसत्या उचापात्या तत्काळ थांबवा. माझ्या बद्दल जो अपप्रचार सुरू आहे. तो तातडीने थांबवा.

2023 म्हसोबा यात्रे वेळी समस्थ गावातून, वाडी वस्त्यावरून, शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्या. त्यानंतर प्रशासनाकडे, लोकप्रतीनिधीं कडे तक्रार करण्यात आली. काय उपयोग झाला.?

आज म्हसोबा मंदिर ताब्यात घेतले, पुजारी बदलला असा अप्रचार सुरू आहे. ग्रामपंचायत कमिटी कडून माझ्या बद्दल वारंवार असा अपप्रचार केला जात आहे. गावातील वातावरण गढूळ केले जात आहे. हे त्यांनी तत्काळ थांबवा असा शेवटचा इशारा मी देत आहे.

ज्या ग्रामपंचायत कमिटीला एक महिना झाला गावातील गटारीचा प्रश्न सोडवता आला नाही. त्यांनी श्री क्षेत्र म्हसोबा मंदिर आणि श्री म्हसोबा देवाचा विषय देखील बोलू नये. तुम्ही देवाला नमस्कार करा, मनोभावे भक्ती करा, जत्रा करा, लोटांगण घाला, मात्र देवाला हात लावाल, देव उचलणार अशा वल्गना करू नका. अन्यथा परिणाम चांगले होणार नाहीत. 

आपला

गोरख (बापू) बाळू कांबळे

संस्थापक /अध्यक्ष

श्री खडीचा म्हसोबा मंदिर संस्थान. (नियो)

अलकुड (एस), तालुका: कवठे महांकाळ