पुणे : म्हाडाच्या 5 हजार 863 घरांसाठी आजपासून अर्जविक्री सुरू, 18 ऑक्टोबरला सोडत..

141

Pune : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 5 हजार 863 घरांसाठी आज जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यानुसार दुपारी 12 वाजल्यापासून ऑनलाईन अर्जविक्री- स्वीकृतीस सुरुवात झाली आहे. ऑनलाईन अर्जविक्री आणि स्विकृती ही 29 सप्टेंबरपर्यंत सुरु रहाणार आहे. 18 ऑक्टोबरला या म्हाडाच्या घरांची सोडत ही काढली जाणार आहे.

आज 12 वाजल्यापासून पुणे म्हाडा मंडळातील घरांसाठी अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात झाली आहे. अनामत रक्कमेसह अर्ज सादर करण्यासाठी 29 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. अनामत रक्कम ही प्रत्येक उत्पन्न गटासाठी ही वेगळी आहे. पात्र अर्जांची अंतिम यादी 16 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. पुण्यातील म्हाडाच्या कार्यालयात 18 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता सोडत काढली जाणार आहे. या सोडतीत म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 403, पीएमएवायमधील 431, 15 टक्के सामाजिक गृहयोजनेतील 344, म्हाडा गृहनिर्माण प्रथम प्राधान्य योजनेतील 2445 आणि 20 टक्क्यातील 2240 घरांचा यात समावेश आहे.