#RafaleScam ; मोठा भ्रष्टाचार समोर येणार – पृथ्वीराज चव्हाण

326

सातारा : फ्रेंच एजन्सीच्या माध्यमातून एक माेठा भ्रष्टाचार उघडकीस येईल अशी अपेक्षा आणि विश्वास काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण (prithivraj chavan) यांनी राफेल लढाऊ विमानांच्या (rafel fighter aircraft ) कथित गैरव्यवहार प्रकरणावरील झालेल्या निर्णायवरुन व्यक्त केला आहे. याबाबत आमदार चव्हाण यांनी ट्विट केले आहे.

फ्रान्स आणि भारत यांच्यात झालेल्या 59 हजार काेटी रुपयांच्या राफेल या लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहारातील कथित गैरव्यवहाराचा तपास करण्यासाठी एका फ्रेंच न्यायाधीशाची नियुक्ती करण्यात आली आहे. फ्रान्समध्ये शाेध पत्रकाररितेसाठी प्रसिद्ध असलेले संकेतस्थळ ‘मिडियापार्ट’ ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर भारतात एकच खळबळ उडाली आहे.

आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या ट्विटमध्ये फ्रान्सने भ्रष्टाचा-यांना थारा दिलेला नाही. भ्रष्टाचारी लाेक ते सहन करीत नाहीत हे त्यांनी त्यांचे माजी अध्यक्ष निकोलस सरकोझी Nicolas Sarkozy यांच्या प्रकरणावरुन आपल्याला दिसून येते असे नमूद केले आहे. सरकाेझी यांना देखील फ्रान्सने वाचवले नाही. फ्रेंचमधील भ्रष्टाचारविरोधी एजन्सी राफेल प्रकरणाची सत्यता समाेर आणेलच. जी गाेष्ट भारत देशात शाेधणे अशक्य आहे किंवा शाेधण्यात रसच नाही अशी गाेष्ट आता फ्रेंच एजन्सीच्या माध्यमातून पुढं येईल. एक माेठा भ्रष्टाचार उघडकीस येईल असा विश्वास आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.