Pune By-Elections :कसबा विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर; नाना पटोले यांची माहिती

125

Pune : पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. नाना पटोले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी कसबा विधानसभेच्या उमेदवाराचे नाव जाहीर केलं आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘पुणे जिल्ह्यातील कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत. कसबा मतदारसंघाची जागा कॉंग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून येथून श्री. रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे.’