रामदास आठवले यांच्याकडून हिरवा कंदील. दिपक चंदनशिवे समर्थकांचा जल्लोष…

610

पंढरपूर : आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी पुणे पदवीधर मतदार संघाच्या दिपक चंदनशिवे यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला असल्याचे खात्रीलायक वृत्त युवा प्रभावला प्राप्त झाले आहे. भाजपाचा मित्र पक्ष असलेला आरपीआय (आठवले गटाची) पुणे पदवीधर मतदारसंघावर नजर आहे. पक्षाचे युवक आघाडीचे प्रदेश राज्य संघटन सचिव दिपक चंदनशिवे यांनी चांगलीच मोर्चेबांधणी सुरु केली असल्याचे वृत्त युवा प्रभावाने दिले होते. त्यामुळे दिपक चांदाशिवें यांच्या समर्थकांनी जल्लोष करायला सुरुवात केली आहे.

आक्रमक पदवीधर मतदार नोंदणी, त्या सोबतच मतदारांशी थेट संपर्क, पश्चिम महाराष्ट्रात जनतेची केलेली कामे बळावर दिपक चंदनशिवे यांनी पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे.

रामदास आठवले यांचा वरदहस्त, संत, महंत, वारकरी संप्रदाय आणि आणि आंबेडकरी नेते, कार्यकर्त्यांचे पाठबळ यामुळे दिपक चंदनशिवे यांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.

महाराष्ट्रातल्या पाच विधानपरिषद जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. औरंगाबाद पदवीधर, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी १ डिसेंबरला निवडणूक होणार असून, ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.