दुरुस्तीच्या कारणास्तव BMC चे मुलुंड आणि चेंबूरचे स्विमिंग पूल बंद…

61

Mumbai : मुंबई महापालिकेचे मुलुंड, चेंबूर आणि दहिसर येथील तीन जलतरण तलाव दुरुस्तीच्या कारणास्तव बंद करण्यात आले आहेत. यामुळे पोहोणाऱ्यांची, व्यायामपटूंची मोठी गैरसोय होत आहे.

चेंबूरचा तलाव कधी सुरू होणार याबाबत अनिश्चितत आहे. तर मुलुंडचा तलाव सुरू होण्यास तब्बल एक महिना लागणार असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई महापालिकेचे एकूण तेरा जलतरण तलाव शहरात आहेत. या तरणतलावाचे सभासदत्व घेण्यासाठी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद असतो. उन्हाळ्याच्या दिवसात तरणतलावात पोहोण्यासाठी येणाऱ्यांची संख्या देखील मोठी असते. तसेच शाळांना सुट्ट्या पडल्यामुळे लहान मुलेही मोठ्या संख्येने येत असतात.

मात्र भर उन्हाळ्यातच मुंबई महापालिकेचे तीन जलतरण तलाव बंद असल्यामुळे नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

त्यापैकी मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रिडा संकुलातील जलतरण तलाव हा गेल्या कित्येक दिवसांपासून बंद आहे.