मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला जाणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ (Missing Link) प्रकल्पाचे लोकार्पण येत्या १ मे रोजी करण्यात येणार आहे. हा प्रकल्प आधुनिक अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुना मानला जात आहे.
प्रवासाचा वेळ २५-३० मिनिटांनी वाचणार
या नवीन मार्गामुळे मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे. लोणावळ्या जवळील घाट सेक्शनला पर्याय म्हणून हा मार्ग तयार करण्यात आल्याने, प्रवाशांचा सुमारे २५ ते ३० मिनिटांचा वेळ वाचणार आहे.
अमृतांजन पॉईंटजवळील अवघड वळणे आणि वाहतूक कोंडीतून प्रवाशांची कायमची सुटका होईल. हा मार्ग तयार करताना अत्याधुनिक ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. या मार्गामुळे वेळेसोबतच वाहनांच्या इंधनाची मोठी बचत होण्यास मदत होईल.
“गेल्या काही वर्षांत पायाभूत सुविधांचे जाळे विणण्यात महाराष्ट्र आघाडीवर राहिला आहे. समृद्धी महामार्ग आणि अटल सेतू नंतर आता ‘मिसिंग लिंक’ ही महाराष्ट्राची नवीन ओळख बनणार आहे.”
हा प्रकल्प केवळ वेळेची बचत करणारा नसून, मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांमधील दळणवळणाला एक नवी गती देणारा ठरेल.
महाराष्ट्र दिनी हे खास गिफ्ट राज्याला मिळत असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.








