मुंबई : दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्राला ४ हजार ७१४.२८ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षखालील उच्चस्तरीय समितीने महाराष्ट्रासह देशातील सहा राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशाला ७ हजार २१४. ०३ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधी देण्याची मंगळवारी घोषणा केली.
महाराष्ट्राला ४७१४.२८ कोटी, कर्नाटकला ९४९.४९ कोटी रुपये, आंध्र प्रदेशला ९००.४० कोटी रुपये, गुजरातला १२७.६० कोटी रुपये तर पूर आणि भूस्खलनग्रस्त हिमाचल प्रदेशला ३१७.४४ कोटी रुपये, उत्तर प्रदेश : १९१.७३ कोटी रुपये तर वादळाने त्रस्त झाले पुद्दुचेरीला१३.०९ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी जाहीर करण्यात आला आहे.









