प्रजासत्ताक दिनी लष्करी सामर्थ्याचे आणि सोबतच देशातील संस्कृतीचे प्रदर्शन..

37

नवी दिल्ली – आज देशभरात ७० वा प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला. राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या माध्यमातून जगभराला देशाच्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन घडले. येथे सादर झालेल्या विविध कार्यक्रमांच्या आणि रथांद्वारे देशातील वैविध्यपूर्ण संस्कृतीचेही दर्शन घडले.
पंतप्रधान मोदींनी अमर जवान ज्योती येथे देशासाठी बलिदान दिलेल्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी लष्कराच्या तिन्ही दलाचे प्रमुख याठिकाणी उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींसह प्रमुख अतिथिंचे राजपथावर स्वागत केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यानंतर राजपथावर परेडला सुरुवात झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सायरील रमपोसा हे यंदाच्या गणतंत्र दिन सोहळ्याचे मुख्य अतिथी आहेत.