“त्यापेक्षा १०० कोटी मला द्या.,” बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला ‘शोभा डें’चा विरोध..

59

मुंबई : कुणाला हवी आहेत स्मारकं, आम्हाला तर रुग्णालये आणि शाळा पाहिजेत, असे म्हणत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला विरोध दर्शविणारे ट्विट लेखिका शोभा डे यांनी केलं आहे.

लेखिका शोभा डे नेहमीच आपल्या ट्विटमुळे व टिपण्णीमुळे नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी असतात. आताही डे यांनी १०० कोटींच्या स्मारकाबद्दल ट्विट करुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. एक नागरिक म्हणून मला १०० कोटी रुपये खर्च करण्याचा अधिकार द्या. मग, पाहा मी कशाप्रकारे या १०० कोटी रुपयांची गुंतवणूक लोकांच्या कल्याणासाठी करते, असे डे यांनी म्हटले आहे. तसेच स्मारकं कुणाला हवी आहेत? आम्हाला तर शाळा आणि रुग्णालये पाहिजेत, असे ट्विट शोभा डे यांनी केलंय. डे यांच्या टि्वटमुळे पुन्हा एक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.