ईव्हीएम हँकिंग ची कल्पना असल्यामुळेच गोपीनाथ मुंडे हत्या…

59

गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून झाल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर एक्सपर्टनं केला आहे.

ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणूनच गोपीनाथ मुंडेंची हत्या झाल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर एक्सपर्टनं केला आहे. त्यानं लाइव्ह प्रेस कॉन्फरन्स घेऊन या संदर्भात अनेक खळबळजनक दावे केले आहेत.

सय्यद शुजा व त्याच्या सहकाऱ्यांवर हल्ले झाले होते असंही त्यानं म्हटलं आहे. शुजा इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरशन ऑफ इंडिया लि.चा २००९ ते २०१४ या कालावधीत कर्मचारी होता असं त्यानं म्हटलं आहे. त्यानं सांगितलं की निवडणूक आयोग तसेच राजकीय पक्षांनाही बोलावण्यात आलं होतं, परंतु कपिल सिब्बलवगळता अन्य कुणी गेलेलं नाही. ही पत्रकार परिषद लंडनमध्ये सुरू असून शुजावर चार दिवसांपूर्वी हल्ला झाला होता, त्यामुळे तो गुप्त ठिकाणावरून व्हिडीयो कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपर्कात आहे.

दिल्ली मधल्या २०१५ मधल्या निवडणुकांतही घोळ होणार होता, परंतु आम्ही वेळीच दुर्घटना रोखली आणि आपनं ७० पैकी ६७ जागा जिंकल्या अन्यथा भाजपानं निवडणुका जिंकल्या असत्या असं शुजानं म्हटलं आहे.