मुंबई- बॉलीवूड मधील अभिनेत्री स्वरा भास्कर हिने एका दिग्दर्शकावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. स्वराने तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराला Me too च्या माध्यमातून वाचा फोडली आहे.
एका दिग्दर्शकाने तिचे लैंगिक शोषण केले होते. परंतु ती गोष्ट समजण्यासाठी आपल्याला 6-7 वर्षे लागली. असा आरोप स्वरा भास्करने केला आहे. कामाच्या ठिकाणी तिचे लैंगिक शोषण झाले होते. मात्र, स्वराने अद्याप कोणाचेही नाव घेतलेले नाही.
स्वराने सांगितले की, एका कार्यक्रमात गेली असता एक महिला कामाच्या ठिकाणी तिचे कशाप्रकारे लैंगिक शोषण झाले, हे सांगत होती. तेव्हा आपल्यासोबतही ही घटना घडल्याचे स्वराच्या लक्षात आले आणि लैंगिक शोषणच होते.
आपल्या देशात अनेक लहान मुलींना लैंगिक अत्याचाराला बळी पडावे लागत आहे. हे कसे ओळखावे याबाबत कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन केले जात नाही. मुलींना याबाबत मार्गदर्शन करण्याचीनितांत आवश्यकता आहे.








