पणजी – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. गोव्यातील काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडनकर यांनी राष्ट्रपती कोविंद यांना पत्र लिहून यासंदर्भातील मागणी केली आहे. रफाल विमानात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणाशी संबंधित फायलींवरून पर्रिकर यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे, माजी संरक्षण मंत्री पर्रिकर यांच्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात यावा अशी विनंती चोडनकर यांनी केली आहे. गोवा काँग्रेसने एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप जारी करताना त्यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात विलंब झाला असा आरोप लावला. या क्लिपमध्ये आरोग्य मंत्री विश्वजीत राणे फोनवर एकाशी संवाद साधत होते. त्यामध्ये, त्यांनी रफालच्या व्यवहारांच्या फायली माजी संरक्षण मंत्री पर्रिकर यांच्या बेडरुममध्ये असल्याचा उल्लेख केला होता.








