मुंबई- महाराष्ट्राच लोकप्रिय व्यक्तिमत्त्व पु. दल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित ‘भाई – व्यक्ती की वल्ली’ हा चित्रपट ४ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र ऐन रिलीजच्या तोंडावरच हा चित्रपट मुंबई आणि पुण्याच्या सिंगल स्क्रिन मालकांनी नकार दिल्याने चित्रपटच रिलीज होणार की नाही असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. रणवीर सिंगचा ‘सिम्बा’ ह्या चित्रपटाची बॉक्स ऑफिस वर दमदार वाटचाल सुरु असल्याने मुंबई-पुण्यात महेश मांजरेकरांच्या ‘भाई…’ या मराठी चित्रपटाला सिंगल स्क्रिन्स मालकांनी एकही शो देण्यास नकार दिला आहे. “भाई” वर “सिम्बा” भारी पडतोय का? असा प्रश्न मराठी प्रेक्षकांना पडला आहे.
‘भाई…’ चित्रपटाची तिकिटं बुक करण्यासाठी अनेक जण ऑनलाईन आणि वर्तमानपत्रांमध्ये थिएटर शोधत होते, मात्र आपल्या जवळच्या चित्रपटगृहात चित्रपट नसल्याने अनेकांनी निराशा झाली. दिग्दर्शक महेश मांजरेकरांनीही याला दुजोरा दिला आहे. ‘सिम्बा’ चालतो तर चालू दे, पण आमच्या चित्रपटाला एक तरी शो मिळायला हवा, असं मत माजरेकांनी मांडलं आहे.








