पुण्यात विषारी दारूचे ‘मृत्यूतांडव’! १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू; मुख्य आरोपी अटकेत, नागरिकांचा तीव्र संताप..

64

पुणे/पिंपरी-चिंचवड: पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विषारी स्पिरिटयुक्त गावठी हातभट्टीची दारू पिमल्यामुळे तब्बल १३ निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भीषण घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, मृतांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ही काळीज पिळवटून टाकणारी घटना पिंपरी-चिंचवडमधील दापोडी, फुगेवाडी आणि पुण्याच्या काळेपडळ, हडपसर परिसरात घडली आहे.

सराईत दारू विक्रेता पोलिसांच्या ताब्यात

या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली आहेत. या प्रकरणातील मुख्य सराईत दारू विक्रेता योगेश वानखेडे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक केल्यानंतर पोलिसांनी परिसरातील अवैध हातभट्ट्यांवर धडक कारवाई करत त्या पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या आहेत. मात्र, १३ जणांचा बळी गेल्यानंतरच पोलिसांना जाग का आली? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

स्थानिक नागरिकांचा संताप; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह : या भीषण दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अवैध धंद्यांना कोणाचे संरक्षण? : शहरात सर्रासपणे सुरू असणाऱ्या अशा अवैध हातभट्ट्या आणि दारू विक्री पोलिसांना माहिती नव्हती का? असा सवाल नागरिक विचारत आहेत.

आशीर्वाद कोणाचा?  : या अवैध धंद्यांना स्थानिक पातळीवर कोणाचे मूक संरक्षण मिळत होते, यावरही आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात असून, दोषी पोलिसांवरही कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा अनधिकृत आणि विषारी दारू विक्रीचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने वेळीच पावले उचलली असती, तर हे १३ निष्पाप जीव वाचले असते, अशा भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहेत.

()

👉वाचा आणि शेयर करा,

👉 व्हॉट्स अप ग्रुप मध्ये जॉइन व्हा. 

👉नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी नियमित वाचत रहा. 

www.YuvaPrabhav.Com

An Independent Marathi News Portal.