पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांच्या 31 डिसेंबर रोजीच्या नियोजित सभेसाठी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी परवानगी नाकारली आली आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने शिवप्रतिष्ठानचे संभाजी ऊर्फ मनोहर भिडे, समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे, कबीर कला मंच कार्यकर्त्यांसह एकूण 58 जणांना 31 डिसेंबर व एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा, वढू, पेरणेफाटा व सणसवाडी परिसरात येण्यास प्रवेशबंदी केली आहे. गेल्या वर्षीच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी पावले उचलली आहेत.
पोलिसांनी सीआरपीसी कलम 144 नुसार विविध संघटनांशी संबंधित असलेल्या 58 जणांना नोटिसा बजावल्या असून सीआरपीसी 177 नुसार 188 जणांना दुसरीकडे स्थानांतरित करण्यात आले असून सरार्इत 29 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी संबंधित भागात इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.








