BIS ने मुंबईत कांदिवली इथे घातले छापे; एलईडी मोडयूल्स साठीच्या कंट्रोल गियर चा मोठा अवैध साठा केला जप्त

188

भारतीय मानक ब्यूरोच्या (बीआयएस) मुंबई शाखेतील अधिकाऱ्यांच्या पथकाने 3 जुलै 2023 रोजी कांदिवली पूर्व इथल्या एका उत्पादन विभागावर छापे घातले आणि बीआयएसच्या प्रमाणनाशिवाय जमा केलेला कंट्रोल गियरचा मोठा साठा जप्त केला.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान माल ( ज्यासाठी नोंदणी अनिवार्य) कायद्याचे उल्लंघन केल्याची माहिती मिळाल्याबरोबर त्वरित कृती करत, गुणवत्ता नियंत्रण आदेश 2021 नुसार, भारतीय मानक ब्यूरोच्या मुंबई शाखेच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने, मेसर्स जेएसके इनोव्हेटीव्ह टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या C-207, दुसरा मजला, जय बोनान्झा इंडस्ट्रियल इस्टेट, अशोक चक्रवर्ती रोड, कांदिवली पूर्व, मुंबई- 400101,इथल्या कार्यालयावर, छापे घातले. या छाप्यादरम्यान असे आढळून आले की ही कंपनी एलईडी मॉड्यूल्ससाठी आवश्यक इलेक्ट्रॉनिक कंट्रोल गियरचे उत्पादन, साठवण आणि विक्री करत होती. IS 15885 (भाग 2/सेक 13) नुसार कंट्रोल गियर BIS प्रमाणित नव्हते जे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान वस्तू (कंप्युइजरी नोंदणीची आवश्यकता) गुणवत्ता नियंत्रण आदेश 2021 चे उल्लंघन आहे. फार मोठ्या संख्येने अशाप्रकारच्या इलेक्ट्रॉनिक कंट्रोल गियरचा साठा आणि त्याची लेबले दरम्यान आढळली. बीआयएस कायदा 2016 च्या कलम 17(1) (a) चे उल्लंघन केल्यामुळे छापा जप्त करण्यात आला. या कायद्याचे उल्लंघन केल्यास दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा किमान 2,00,000 रु. दंड, किंवा दोन्ही अशा प्रकारची शिक्षा होऊ शकते. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

अशा फसवणुकीच्या घटना घडू नयेत म्हणून, सर्व ग्राहकांना बीआयएस प्रमाणित असलेल्या उत्पादनांची यादी शोधण्यासाठी बीआयएस केअर ॲप (मोबाईल अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीमध्ये उपलब्ध) वापरण्याचे आवाहन विभागाने केले आहे. तसेच, उत्पादने खरेदी करण्यापूर्वी त्यावर आयएसआय मार्क आहे ना, हे तपासण्याची विनंतीही केली आहे. अधिक माहितीसाठी, http://www.bis.gov.in. या वेबसाईटला भेट द्या.

 

बीआयएस प्रमाणपत्राशिवाय उत्पादने विकली जात असतील किंवा कोणत्याही उत्पादनावर आयएसआय मार्कचा गैरवापर होत असेल अशी कोणतीही घटना त्यांना आढळल्यास नागरिकांना विनंती केली जाते की त्यांनी पुढील पत्त्यावर –

(हेड, MUBO-I, पश्चिम क्षेत्रीय कार्यालय (BiS 5 वा मजला, CETTM कॉम्प्लेक्स, हिरानंदानी गार्डन, पवई, मुंबई – 400076) यांना कळवावे. अशा तक्रारी hmubol@bis.gov.in. या पत्त्यावर ई-मेलद्वारे देखील केल्या जाऊ शकतात. अशा माहितीचा स्रोत गोपनीय ठेवला जाईल.

भारतीय मानक ब्यूरो, सुरक्षित, विश्वासार्ह तसेच गुणवत्तापूर्ण उत्पादने, ग्राहकांवर किमान दुष्परिणाम करणारे आणि पर्यावरण स्नेही उत्पादने पुरवून देशाच्या अर्थवयवस्थेत योगदान देत आहे.

भारतीय मानक ब्युरोची मानके आणि उत्पादन प्रमाणपत्र योजना उद्योग आणि ग्राहकांच्या फायद्याच्या तर आहेतच, त्याच बरोबर विशेषतः उत्पादन सुरक्षा, ग्राहक संरक्षण, अन्न सुरक्षा, पर्यावरण संरक्षण, बांधकाम क्षेत्र या संबंधी विविध सार्वजनिक धोरणांत देखील मदत करतात.

बीआयएस कायदा 2016 नुसार, कोणतीही व्यक्ती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान (अनिवार्य नोंदणी आवश्यक ) गुणवत्ता नियंत्रण आदेश 2021 शिवाय, कोणत्याही वस्तूंचे उत्पादन, आयात, वितरण, विक्री, भाड्याने, भाड्याने, स्टोअर किंवा विक्रीसाठी प्रदर्शन करू शकत नाही.त्यासाठी वैध परवाना आणि मानक चिन्ह असणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी नागरिक (http://www.bis.gov.in/wp-content/uploads/2020/ 12/BIS-Act-2016.pdf).या लिंक वर जाऊ शकतात.