अजित आगरकरांची भारतीय क्रिकेट निवड समितीच्या चेअरमनपदी नियुक्ती

227

भारतीय क्रिकेटच्या खेळाडूंच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर यांची निवड करण्यात आली आहे.

सध्या निवडसमिती अध्यक्षाला वर्षाला १ कोटी रूपये मानधन मिळते. तर, सदस्यांना ९० लाख रूपये मिळतात. अजित आगरकरांनी निवड समिती अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला. अर्ज करणाऱ्यांच्या यादीत आगरकर हे एकमेव मोठं नाव आहे. आगरकर यांनी गुरूवारी दिल्ली कॅपिटल्सच्या सहाय्यक प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी यापूर्वी २०२० मध्ये देखील निवडसमिती सदस्यासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यावेळी बीसीसीआयने त्यांची निवड केली नव्हती.