#CORONAUPDATE : करोनाचा कहर सुरूच; दैनंदिन रुग्ण संख्येचा उच्चांक…

286

नवी दिल्ली : मागील २४ तासात देशात करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येने उच्चाकं गाठला आहे. भारतात मागील आठवड्यापासून दैनंदिन रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली आहे. गुरुवारी २४ तासांमध्ये तब्बल ३ लाख ७९ हजार २५७ नवीन रुग्ण सापडले असून ३६४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे.

देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ७९ हजार २५७ नवीन रुग्ण सापडल्याने रुग्णसंख्या १ कोटी ८३ लाख ७६ हजार ५२४ झाली आहे. आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ४ हजार ८३२ इतकी झाली आहे. आतापर्यंत १ कोटी ५० लाख ८६ हजार ८७८ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत.