#Tokyo2020 : भारतीय हॉकी संघ ४९ वर्षानंतर उपांत्य फेरीत; ब्रिटनचा केला पराभव…

295

भारतीय हॉकी संघाने ब्रिटनच्या संघावर 3-1 असा विजय मिळवत उपांत्य फेरीत आगेकूच केली. 1972 नंतर पहिल्यांदाच भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रम केला आहे.

दिलप्रीत सिंग, गुरजंत सिंग आणि हार्दिक यांनी प्रत्येकी एक गोल करत, भारतीय पुरुष हॉकी संघाच्या नावावर ऑलिम्पिक स्पर्धेत 8 सुवर्णपदकं आहेत. शेवटचं पदक 1980 मध्ये भारताने मिळवलं होतं. उपांत्य फेरीत भारतीय संघाचा मुकाबला बेल्जियमशी होणार आहे.