सुदान मध्ये अडकले महाराष्ट्राचे 100 कामगार, मदतीसाठी केली भारत सरकार आणि राज्य सरकारकडे विनंती

368

सुदान : सुदान ह्या देशात, अंतर्गत यादवी युध्दामुळे महाराष्ट्रातील एकूण शंभर नागरीक अडकले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदान येथील केनाना शुगर कंपनीत हे सर्व कामगार काम करत आहेत. मूळचे सोलापूर, सांगली, सातारा, अहमदनगर येथील हे कामगार आहेत. केनाना शुगर कंपनी व्यवस्थापन कोणतीही मदत करायला तयार नाही. भारतीय दूतावास हात वर करत असल्याचे ह्या कामगारांचे म्हणणे आहे. सर्व कामगार एकत्र असून भयभीत आहेत. भारत सरकार, राज्य सरकारने तातडीने लक्ष घालून मदत करण्याची विनंती ह्या कामगारांनी केली आहे.

भारतीय दूतावासाने अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी निश्चित केलेल्या ठिकाणापासून ही कंपनी बाराशे किलोमीटरवर अंतरावर आहे. कंपनी प्रशासन ह्या कामगारांना पोर्ट पर्यंत जाण्यासाठी कोणतीही मदत करत नाहीय.

भारत सरकारच्या परराष्ट्र खात्याकडून ऑपरेशन कावेरी अंतर्गत भारतीय नागरिकाना मायदेशी आणले जात असून आतापर्यंत काही भारतीयांना मायदेशी आणण्यात आले आहे. मात्र अनेक लोक सुदान मध्ये अजूनही अडकून आहेत. सुदान मधील भारतीय दुतावासाने मायभूमीत आणण्यासाठी निश्चित केलेले ठिकाण हजार ते बाराशे किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे हे बाराशे किलोमिटर चे अंतर कसे पार करायचे हा प्रश्न ह्या कामगारांपुढे आहे.