SudanUpdate : भारतीय दूतावास प्रतिसाद देत नसल्याने महाराष्ट्रातील १०० कामगारांचा पायी निघण्याचा निर्धार..

सुदान येथील केनाना शुगर कंपनीत अडकलेत महाराष्ट्राचे १०० कामगार..

245

सुदान : सुदान ह्या देशात, अंतर्गत यादवीमुळे युध्दाचा भडका उडाला आहे. सर्वत्र युद्धजन्य परिस्थिती आहे. तेथील केनाना शुगर कंपनीत महाराष्ट्राचे १०० कामगार अडकल्याची बातमी काल Yuvaprabhav.Com ने प्रसिद्ध केली होती. काल मिळालेल्या माहिती नुसार येथील सर्व कामगारांनी एकत्र येत एक मीटिंग घेतली होती. इतरत्र सगळी कडे युद्धाचे वातावरण असताना आता ह्या कामगारांनी आता रस्त्याने पायी निघण्याचा निर्धार केला आहे.

महाराष्ट्राचे १०० आणि इतर राज्यातील जवळपास ३०० कामगार असे भारताचे एकूण ४०० ते ४५० कामगार केनाना कंपनीत अडकले आहेत. कंपनी व्यवस्थापनाने कोणतीही जबाबदारी घेत नाहीय. भारतीय दूतावास प्रतिसाद देत नसल्याचे ह्या कामगारांचे म्हणणे आहे.

मूळचे सोलापूर, सांगली, सातारा, अहमदनगर येथील हे कामगार आहेत. केनाना शुगर कंपनी व्यवस्थापन कोणतीही मदत करायला तयार नाही. भारतीय दूतावास हात वर करत असल्याचे ह्या कामगारांचे म्हणणे आहे. सर्व कामगार एकत्र असून भयभीत आहेत. भारत सरकार, राज्य सरकारने तातडीने लक्ष घालून मदत करण्याची विनंती ह्या कामगारांनी केली आहे.

भारतीय दूतावासाने अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी निश्चित केलेल्या ठिकाणापासून ही कंपनी बाराशे किलोमीटरवर अंतरावर आहे. कंपनी प्रशासन ह्या कामगारांना पोर्ट पर्यंत जाण्यासाठी कोणतीही मदत करत नाहीय.