काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी आयोजित “वक्ता प्रशिक्षण शिबीर” उत्साहात संपन्न.. 

प्रभावशाली भाषण देण्याची शैली आत्मसात करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी तर्फे "वक्ता प्रशिक्षण शिबीर" आयोजित करण्यात आले होते.

189

Mumbai : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीतर्फे तसेच राकेश शंकर शेट्टी, प्रवक्ता, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी यांच्या सौजन्याने मुलुंड येथील एकता एनजीओ सभागृहात वक्ता प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शैक्षणिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश रेड्डी, सरचिटणीस, वक्ता विभाग, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी यांच्या तर्फे करण्यात आले. रविवार, दिनांक १९ मार्च २०२३ रोजी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

सदर शिबिरात उपस्थित राहणाऱ्या सर्व सभासदांना महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीतर्फे प्रमाणपत्र देण्यात आली. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी युवक काँग्रेसचे तसेच अनेक तरुण वर्ग उपस्थित होता.