मुंबई बेंगलोर हायवेवर खासगी बसला पुण्यात अपघात, पाच प्रवासी जखमी…

145

Pune : मुंबई बेंगलोर हायववेवर पुण्यात बावधन येथे एका खासगी बसचा अपघात झाला असून या अपघातात 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईवरुन बेंगलोरला चाललेल्या या खासगी बसमध्ये 35 प्रवासी असल्याची माहिती मिळाली. रात्री 11 च्या सुमारास बावधन येथील सीएनजी पेट्रोल पंपाजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस सर्व्हिस रोडवर पलटी झाली. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना कोथरुडच्या रुग्णायलयात भर्ती करण्यात आले आहे.