विशेष लेख : …आता रुपया ही दहशतीत. 

245

चड्डीधारी मोदी युग आल्या पासून सारा देश दहशतीत गेला आहे. भारतीय समाज, संस्कृती, धर्म , राजकारण , अर्थकारण आणि आता अखेरीस रुपयाही त्या पासून अपवाद राहिला नाही. ठळक बातमी आहे, आपला रुपया डॉलरच्या मूल्यात ऐतिहासिक निचांकी घसरला आहे. प्रति डॉलर मागे आपल्याला ७७.५० रुपये मोजावे लागतील. त्या मूल्यांचे आपला देश आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार करेल. त्यात निर्यात नाममात्र आणि आयात सर्वाधिक आहे. परदेशी गुंतवणूक नाही. आणि असलेली गुंतवणूक परत जात आहे. अशा टोकाच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारात आपला टिकाव व रुपयांची पुढे काही दिवसांत काय अवस्था होईल, याचा अंदाज येवून जाते. सर्व क्षेत्रात घसरत अत्यंत खालची पातळी गाठणे हे मोदी सरकारचे विश्वगुरुत्व सिध्दी असेल तर या सरकारवर आसूड हाणलाच पाहिजे. कारण रुपया निचांकी घसरणीचा देशाला परिणामतः नव्वद टक्के देशवासीयांना भोगावा लागेल. ती आणखी महागाई शिवाय रोजगारांवर वाईट परिणामाने. असे होणे म्हणजे उरली-सुरली लोकांची क्रयशक्ती राहील की नाही, हे काही सांगता येणार नाही. यावर लक्ष केंद्रित करण्या ऐवजी मोदी सरकारचे लक्ष हे हनुमान चालीसा, मंदिर, मशीद, बुलडोझर यावर अधिक आहे. मग देशाचे ही शेजारी श्रीलंके प्रमाणे राजकीय गत झाल्या शिवाय राहणार नाही. म्हणजे देशात गृहयुद्ध होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हे जर मोदी व संघी गोतावळ्याला मंजूर असेल तर एकदा होवून जावू द्या. या मतांचे आम्ही देखील आहोत.

मोदींच्या चुकीच्या धोरणामुळे रुपयांची निचांकी घसरणी झाली आहे. याला रशिया – युक्रेन युध्द व त्यात झोपाटल्या गेलेले युरोपियन देश.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे वाढते दाम, कोरोनाचा दुनियेतील प्रादुर्भाव व त्या काळातील लॉकडाऊन. असे कारण दिले जाते आहे. आमच्या मते ते पूर्ण सत्य नाही. त्याला मोदी सरकारची धर्मांध संघी एकाधिकार निती देखील तेवढीच जबाबदार आहे. देशात ब्राह्मणी वर्चस्व व व्यवस्था निर्माण करण्याची खेळीमुळे जन धन योजना, नोटबंदी व लागलीच एक देश, एक कर प्रणाली म्हणून लागू केलेली जीएसटी सुध्दा म्हणता येईल. या धोरणांनी सर्वसामान्य लोकांच्या खिश्यातील जमा पूंजी काढली. वस्तू विनियोगात लोकांची आर्थिक लुबाडणूक आणि हिरावल्या गेलेला रोजगार यामुळे लोकांची क्रयशक्ती एकदम घटली.मागणी वरुन उत्पादन आणि उत्पादनासाठी रोजगार निर्मिती अशी ती साखळी आहे.त्या साखळीला मोदी सरकारने आघात केला.त्यामुळे लोकांची क्रयशक्ती घटली. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात पन्नास टक्केच्या कमी लोकांनी एकवेळ जेवण घेतले.असा अहवाल म्हणतो.मग काय होणार क्रयशक्ती नसेल तर परदेशी गुंतवणूक परत जाणारच !

भारत हा उपभोगतावादी देश आहे.आणि जग बाजारवादी ! यात आपल्या देशाचे जागतिक बाजारातील व्यवहार म्हणजे आयात- निर्यात सरासरी निम्मे तफावताची आहे. जानेवारी २०२२ मध्ये व्यापारी निर्यात ३४.५० अब्ज डॉलर होती. या तुलनेत जानेवारी २०२२ मध्ये व्यापारी आयात ५१.९३ अब्ज डॉलर होती, जी जानेवारी २०२१ मधील ४२.०३ अब्ज डॉलरच्या तुलनेत २३.५३ टक्क्यांनी जास्त होती.जानेवारी २०२२ मध्ये जानेवारी २०२१ मधील (-) १४.४९ अब्ज डॉलरच्या तुलनेत व्यापार संतुलन (-) १७.४२ अब्ज डॉलर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. ही (-) २०.२३ टक्क्यांची घसरण आहे. जानेवारी २०२० च्या (-) १५.३० अब्ज डॉलरच्या तुलनेत जानेवारी २०२२ मध्ये व्यापार संतुलनात (-) १३.९१ इतकी नकारात्मक वृद्धी दिसून आली. सर्वात जास्त आयात कच्च्या तेलाची होते.दररोज आपल्याला कच्च्या तेलाची मागणी जानेवारी २०२२ पासून ४५ लाख बॅरल्स आहे.तेलाची मागणी देशात वाढली आणखी ८ टक्केनी वाढून ती ५१.५० लाख बॅरल्स प्रतिदिन वर जाईल.हा सारा आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार डॉलरमध्ये होतो. ते परकीय चलन ३१ डिसेंबर २०२१ रोजी ६३,४०० कोटी अमेरिकन डॉलर्स होते.अशात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत एकी कडे वाढ झाली तर दुसऱ्या बाजूने परदेशी गुंतवणूक देशातून परत जाती झाली. त्याचा परिणाम गंगाजळी आटत रुपयाचे मूल्य आंतरराष्ट्रीय बाजारात घसरत निचांकी आले.हा सारा प्रताप मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणाचा आहे.बाजारवादात व्यक्तीची क्रयशक्ती महत्वाची असते.तेच संपविण्याचे काम आपल्या आठ वर्षांच्या कार्यकाळात चड्डीधारी मोदी सरकारनी केले.ते आताही अखंड कायम आहे.तो आपण वाढत्या महागाईच्या चटक्यांनी अनुभवत आहोत.ही लूटमार कशी सरकार कडून होत आहे , या विषयी टाइम्स ऑफ इंडिया’चा एक रिपोर्ट आहे.त्यानुसार आजच्या घडीला दरडोई उत्पन्नाच्या तुलनेत विचार केल्यास आपल्याला खरेदी करावे लागणारे पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस हे जगातल्या सगळ्यात महाग दरांमध्ये येतात.म्हणजे समजा एक अमेरिकन माणूस एक लिटर पेट्रोल भरतो तेव्हा त्याची किंमत ही त्याच्या दिवसाच्या दरडोई उत्पन्नाच्या ०.६ टक्के एवढी असते. हाच आकडा ब्रिटिशांच्या देशात १.५ टक्के इतका आहे. आपल्या शेजारी चीनमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत ही दरडोई उत्पन्नाच्या ४.१टक्के इतकी आहे.

आता भारताचे आकडे बघा. जेव्हा भारतातील माणूस गाडीत एक लिटर पेट्रोल भरतो तेव्हा तो त्याच्या दिवसाच्या दरडोई उत्पन्नाच्या तब्बल २३.५ टक्के इतकी किंमत मोजत असतो! डिझेल(२०.९ टक्के) आणि एलपीजी(१५.६टक्के)चे आकडेही असेच चिंताजनक आहेत. हे मोदी धोरण देशाला खड्ड्यात घालणारे आहे.तो संकेत रुपयांच्या ऐतिहासिक निचांकी घसरणीच्या रुपाने मिळाले आहे.रुपया दहशतीत आला आहे.ही ब्राह्मणी दहशत आहे.ती देशाला बुडविणारी आहे.ब्राह्मणांचे काय ,त्यांची नवीन पीढी बहुसंख्येने विदेशात स्थायी झाली आहे.प्रश्न तुमचा- आमचा बहुजनांच्या भविष्याचा आहे.त्यासाठी विचार आम्हीच केला पाहिजे. त्यावर उपाय हा ब्राह्मण्यवाद जेवढ्या लवकर नाकारता येईल, फेकता येईल, तेवढा जल्दी प्रयत्न केला पाहिजे.

लेखक : मिलींद फुलझेले

नागपूर.

संपादक : दैनिक “बहूजन सौरभ”

संपर्क : ७७२१०१०२४७

 

डिस्क्लेमर (अस्वीकरण) : या लेखात व्यक्त केलेली मते लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखातील कोणत्याही माहितीची अचूकता, पूर्णता, व्यावहारिकता किंवा सत्यता यासाठी www.YuvaPrabhav.Com जबाबदार नाही. या लेखातील सर्व माहिती जशी आहे तशी मांडली आहे. या लेखात व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा तथ्ये किंवा विचार YuvaPrabhav च्या मालकीचे नाहीत आणि YuvaPrabhav त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही. – एडिटर – इन – चीफ

 

बातम्या, लेख, साहित्य आमच्याकडे पाठवा, आम्ही www.YuvaPrabhav.Com या मराठी न्यूज पोर्टल वर प्रकाशित करू. Email : yuvaprabhav@gmail.com