ED च्या छापेमारी नंतर, हसन मुश्रीफ यांनी केले कार्यकर्त्यांनी शांतता राखण्याचे आवाहन..

202

कोल्हापूर : माझ्यावर यापूर्वीही अशाच प्रकारचे छापे टाकण्यात आले होते. तेव्हा ही सर्व कागदपत्रे नेण्यात आली होती. मात्र, तेव्हाही कारवाईतून काहीही निष्पन्न झाले नव्हते. आता पुन्हा कशासाठी छापे टाकले माहित नाही. मात्र, असे असले तरी कार्यकर्त्यांनी शांतता राखावी माझ्यासाठी कोणीही दंगा करू नये, असे आवाहन हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कागल विधानसभेचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील आणि पुण्यातील घरावर आज सकाळी 6 वाजता ईडीने छापे घातले. त्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.