शाहू महाराज आज जिवंत असते तर CAA आणि NRC कायदा टराटरा फाडला असता…

1062

कोल्हापूर : नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी या कायद्याविरोधात संपुर्ण देशात विरोधाचे आणि संतापाचे वातावरण आहे. या कायद्याला अनेक संघटना व विरोधी पक्ष विरोध करत आहेत. “शाहू महाराज आज जिवंत असते तर CAA आणि NRC कायदा टराटरा फाडला असता. हा कायदा राज्यघटनेच्या गाभ्याला धोका पोहचवणारा आहे” असे परखड मत राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

विविध राज्यांमधले सत्ताधारी पक्ष ह्या कायद्यांना विरोध करत आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी CAA आणि NRC चा कडाडून विरोध केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर CAA आणि NRC कायद्याविरोधात येत्या 24 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद चे आवाहन केले आहे.