#ICCT20WorldCup2022 : रेडिओ सिटीने केली माजी क्रिकेटपटू अंजुम चोप्राची सूत्रसंचालक म्‍हणून निवड…

408

Mumbai  : आयसीसी टी२० वर्ल्‍ड कप २०२२ ला सुरूवात झाली आहे आणि रेडिओ सिटी ‘क्रिकेट का ब्‍लॉकबस्‍टर’ या कार्यक्रमाचा नवीन सीझन घेऊन येत आहे. क्रिकेट हा खेळ सर्वांना एकत्र आणतो. हीच बाब लक्षात घेत रेडिओ सिटीचा देशभरातील क्रिकेट चाहत्‍यांचे खेळाच्‍या अस्‍सल उत्‍साहासह मनोरंजन करण्‍याचा मानस आहे. ‘क्रिकेट का ब्‍लॉकबस्‍टर’च्‍या नवीन सीझनसाठी रेडिओ सिटीने शोची सूत्रसंचालिका म्‍हणून माजी क्रिकेटपटू व सध्‍याच्‍या क्रिकेट समालोचक अंजुम चोप्रा यांची निवड केली आहे. टी२० वर्ल्‍ड कपला सुरूवात झाली असल्‍यामुळे देशभरात खेळाचा उत्‍साह पसरला आहे आणि सर्व सहभागी संघांमध्‍ये प्रखर स्‍पर्धा पाहायला मिळत आहे. रेडिओ सिटीचा अंजुम चोप्रा यांच्‍यासोबतचा विशेष शो मैदानावरील उत्‍साहामध्‍ये अधिक भर घालण्यास सज्‍ज आहे. ‘क्रिकेट का ब्‍लॉकबस्‍टर’चे प्रस्‍तुत प्रायोजक म्‍हणून ब्रॅण्‍ड निसानसह रेडिओ स्‍टेशन सर्व क्रिकेट चाहत्‍यांचे सीझनच्‍या अंतिम सामन्‍यापर्यंत मनोरंजन करण्‍यास सज्‍ज आहे.

या नवीन सीझनबाबत बोलताना रेडिओ सिटीचे चीफ क्रिएटिव्‍ह ऑफिसर कार्तिक कल्‍ला म्‍हणाले, ‘’रेडिओ सिटीने नेहमीच नाविन्‍यपूर्ण कार्यक्रम निर्माण केले, जे प्रेक्षकांची रूची व पसंतीशी संलग्‍न आहेत. क्रिकेटप्रती आवडीला कोणतीच सीमा नाही. आयसीसी टी२० वर्ल्‍ड कप सुरू होण्‍यासह क्रिकेट चाहते अधिकच उत्‍साहित झाले आहेत. आम्‍हाला खात्री आहे की, सूत्रसंचालिका म्‍हणून प्रख्‍यात समालोचक अंजुम चोप्रा यांच्‍यासह ‘क्रिकेट का ब्‍लॉकबस्‍टर’चा नवीन सीझन क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेईल आणि त्‍यांना संपूर्ण वर्ल्‍ड कप सीझनमध्‍ये गुंतवून ठेवेल.’’

टी२० क्रिकेट बोनान्‍झाला नुकतेच सुरूवात झाली असताना ‘क्रिकेट का ब्‍लॉकबस्‍टर’मध्‍ये क्रिकेट विश्‍लेषक अंजुम चोप्रा अंदाज व सामन्‍यापूर्वीच्‍या विश्‍लेषणाच्‍या माध्‍यमातून क्रिकेटप्रेमी देशाला लक्षवेधक गाथा सांगतील. त्‍या संघ कशाप्रकारे कामगिरी करतील, त्‍यांच्‍या क्षमता, कोणते खेळाडू चांगली कामगिरी करतील, सामना जिंकण्‍याची त्‍यांची शक्‍यता अशा बऱ्याच गोष्‍टींबाबत सांगतील. मनोरंजनपूर्ण ट्रिव्हिया व सामना विश्‍लेषणाव्‍यतिरिक्‍त शोचे इतर पैलू आहेत उत्‍साहवर्धक राष्‍ट्रगीत, स्‍कोअरचा अंदाज बांधण्‍याची व बक्षीसे जिंकण्‍याची संधी, सामन्‍यानंतर अंजुम यांच्‍यासोबत समालोचन, स्‍पर्धेची विशिष्‍टता आणि सर्व सामन्‍या-संबंधित अपडेट्स. ‘क्रिकेट का ब्‍लॉकबस्‍टर’ सोबतच्‍या सहयोगाबाबत बोलताना क्रिकेट एक्‍स्‍पर्ट अंजुम चोप्रा म्‍हणाल्‍या,  “आपल्‍या देशामध्‍ये वर्ल्‍ड कपचा उत्‍साह शिगेला पोहोचलेला असतो, ज्‍यामुळे मला रेडिओ सिटीचा शो ‘क्रिकेट का ब्‍लॉकबस्‍टर’मध्‍ये ऑन-एअर येण्‍याचा खूप आनंद होत आहे. क्रिकेट का ब्‍लॉकबस्‍टर’ हा रेडिओ सिटीचा शो असून क्रिकेट खेळाइतकाच उत्‍साहवर्धक आहे. श्रोते व क्रिकेटप्रेमींना खेळाचा रोमांचक अनुभव देण्‍यासाठी मी श्रोत्‍यांशी संलग्‍न होत त्‍यांच्‍यासोबत माझ्या क्रिकेटिंग गाथा, ट्रिव्हिया, सामन्‍याबाबत अंदाज, किस्‍से अशा बऱ्याच गोष्‍टी शेअर करणार आहे.’’ ‘क्रिकेट का ब्‍लॉकबस्‍टर’चा मागील सीझन आयपीएल २०२२ दरम्‍यान आयोजित करण्‍यात आला, यावेळी अंजुम चोप्रा यांनी शोच्‍या सूत्रसंचालिका म्‍हणून रेडिओ सिटीसोबत कार्यक्रम केला होता.