खुशखबर ! CIDCO ची 7849 घरांची सोडत जाहीर; 25 ऑक्टोबर पासून करा अर्ज…

788

Mumbai : नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी सिडकोने खुशखबर दिली आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर  सिडको कडून घरांची सोडत (CIDCO House Lottery) जाहीर करण्यात आली आहे. सिडको कडून 7849 घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. दरम्यान ही घरं उलवे नोड मधील बामणडोंगरी, खारकोपर पूर्व या भागात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. हा प्रकल्प ‘परिवहन केंद्रित विकास’ या संकल्पनेवर आधारित आहे. 25 ऑक्टोबर पासून या प्रकल्पासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. तर 19 जानेवारी 2023 दिवशी या घरांसाठीचा निकाल देखील जाहीर केला जाणार आहे.

सिडको कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ही घरं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळ असणार आहेत. गृहसंकुलाच्या परिसरातच शाळा, महाविद्यालयं आणि हॉस्पिटल अशा मूलभूत सुविधा उपलब्ध असणार आहेत.

सिडकोच्या या दिवाळी विशेष जाहीर करण्यात हाऊस लॉटरी मध्ये ऑनलाईन अर्ज नोंदणी 25 ऑक्टोबर ते 22 डिसेंबर 2022 करता येणार आहे. तर अर्ज सादर करण्यासाठी 28 ऑक्टोबर ते 23 जानेवारी पर्यंतचा वेळ असणार आहे. या घरांसाठीच्या सोडतीचा निकाल 19 जानेवारी2023 दिवशी जाहीर केला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. lottery.cidcoindia.com या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हांला ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे. अर्जाचे शुल्क भरण्यासाठी 23 डिसेंबर 2022 पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.