नाशिक मध्ये मोठी दुर्घटना; खाजगी बसला आग, १० जणांचा होरपळून मृत्यू…

175

नाशिक 08 ऑक्टोबर : नाशिक – औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात लक्झरी बस आणि टँकर यांच्यात भीषण अपघात झाला आहे. ही दुर्घटना शनिवारी पहाटे 5 वाजून 15 मि. घडली असल्याची माहिती समोर आली आहे.

या अपघातात चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतला. बसला लागलेल्या या आगीमुळे बसमधील दहा प्रवासी जळून मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे. यवतमाळ येथून बस मुंबईकडे जात असताना हा अपघात घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे

अग्निशामक दलाने बसची आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र बस पेटल्यानंतर ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरता आलं त्यांनी उड्या मारल्या मात्र आतमध्ये अडकलेले प्रवासी आगीमुळे जळून खाक झाले. या घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.

या अपघातात बसने पेट घेतल्याने जळून मयत झालेल्या नागरिकांचे मृतदेह महापालिकेच्या सिटी लिंक बसमधून हलविण्यात आले. या घटनेत 10 लोक जळून खाक झाले तर 34 जणांवर उपचार सुरू आहेत.