अहमदनगर : मागासवर्गीय तरुणांची मुंडण करून नग्न दिंड काढणाऱ्या जातीयवादी गाव गुंडावर गुन्हा दाखल. 

357

अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील मागासवर्गीय सामजाच्या तरुणाचे मुंडण करून त्यांची नग्न दिंड काढणाऱ्या जातीयवादी गाव गुंडांवर रात्री 505(2), 143, 147, 506 चार गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल याबाबत www.YuvaPrabhav.Com वर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.

सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला काळीमा फासणारी घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली. जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे ही घटना घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता. गावातील जातीयवादी समूहाकडून चर्मकार, मातंग आणि नाभिक समाजाच्या चार तरुणांचे मुंडण करून गावातून 4 तास धिंड काढल्याची संतापजनक घटना घडली होती. या संबंधीचा व्हिडिओ ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी ट्विट करून कारवाई करण्याची मागणी केली होती. जातीयवादी गाव गुंडावर तात्काळ कारवाईची मागणी दिपक केदार यांनी केली होती. प्रशासनाने संबधित घटनेची तात्काळ दखल घेवून जातीयवादी गाव गुंडावर गुन्हे दाखल करत कारवाई केली आहे.

www.YuvaPrabhav.Com ने देखील काल याबाबत वृत्त प्रकाशित केले होते.