Petrol Diesel : आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, मुंबईत पेट्रोल 118 पार

302

मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 118.83 रुपये आणि डिझेलचा दरही 103.07 रुपये प्रतिलिटर झाला आहे. राजधानी दिल्लीत आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 40 पैशांनी वाढ झाली असून, त्यानंतर पेट्रोलचा दर प्रति लिटर 103.81 रुपये आणि डिझेलचा दर 95.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 109.34 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 99.42 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 113.45 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 98.22 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.