LTT-Jaynagar Express : जयनगर एक्सप्रेसचे ११ डब्बे रुळावरुन घसरले; एकाचा मृत्यू तर ४-५ जण जखमी…

280

मुंबईहून नाशिकला निघालेल्या LTT-जयनगर एक्स्प्रेसचे (LTT-Jaynagar Express) 11 डबे रुळावरुन घसरले आहेत. ही घटना आज दुपारी नाशिक जिल्ह्यातील लहवी येथे घडली. रेल्वेचे डबे रुळावरुन घसरल्याने त्या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

घटनेची माहिती कळताच रेल्वे प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. रेल्वेचे वैद्यकीय पथकही पाचारण झाले आहे. मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. डबे घसरल्याने घडलेल्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, 4-5 लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.