नसोसवायएफ ने दिला आमरण उपोषणाचा इशारा; शिष्यवृत्ती स्वाधार योजना लागू करण्याची मागणी…

709

नांदेड दि. ०२ | शैक्षणिक वर्षे २०१९-२०२० या वर्षातील विद्यार्थ्यांना आद्यापर्यंत डाँ.बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजनेची पुर्ण रक्कम मिळाली नाही, तसेच शै.वर्ष २०२०-२०२१ या वर्षात डाँ.बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजनेचे अर्ज समाजकल्याण विभागाने अद्यापही स्वीकारले नाहीत. शै.वर्षे २०२०-२०२१ मधील भारत सरकार शिष्यवृति ची रक्कम त्वरित जमा करण्यात आली नाही. डाँ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बार्टी) मार्फत संशोधक विद्यार्थ्यां साठी पोस्टडाँक्टरेट फेलोशिफ सुरू करण्यात आली नाही.

राज्यातील अनुसूचीत जाती च्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हित संवर्धना साठी राज्य सरकारने डाँ.बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजना सुरू केली. राज्यातील अनुसूचीत जाती च्या विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती हि हालाखीची आहे.२०२० पासून सुरु आसलेल्या ताळेबंदी मुळे अनेकांचा रोजगार गेला आहे.अशा परिस्थितीत राज्यातील अनुसूचीत जाती च्या विद्यार्थ्यांनी कसे शिक्षण घ्याचे त्यात राज्य सरकारने सुरू केले स्वधार योजने ची २०१९-२०२० या शै.वर्षाची पुर्ण रक्कम हि विद्यार्थ्यांना मिळाली तसेच २०२०-२०२१ या शै.वर्षाचे अर्ज अद्याप ही समाजकल्याण विभागाने स्विकारले नाहीत. डाँ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बार्टी) या केंद्राची स्थापना हि राज्यातील अनुसूचीत जाती च्या संशोधक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत तसेच या समाजातील संशोधकाना वाव देण्यासाठी करण्यात आली होती. पण अद्याप हि बार्टी मार्फत संशोधक विद्यार्थ्यासाठी पोस्ट-डाँक्टरेट फेलोशिफ सूरु करण्यात आली नाही.राज्य सरकार च्या इतर संशोधन व प्रशिक्षण केंद्र ने मात्र राज्यातील मराठा,ओबीसी विद्यार्थ्यासाठी हि फेलोशिफ सुरू केली आहे. हा भेदभाव थांबने गरजे चे आहे तसेंच समाजिक न्याय विभागात पैसे आसतांना सुधा आपल्या समाजकल्याण मंत्री व अधिकारी अनुसूचीत जाती च्या संशोधक विद्यार्थ्यांना पोस्ट डाँक्टरेट पासून अलिप्त ठेवले आहे. ह्यामुळे नॅशनल एससी एसटी ओबीसी स्टूडंट अँड युथ फ्रन्ट ने उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.

ह्यात 2019-2020 या शै.वर्षातील डाँ.बाबासाहेब आंबेडकर स्वधार ची बाकि असनारी रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करण्यात यावी, 2020-2021 या शै.वर्षाचे स्वधार चे अर्ज समाजकल्यान विभागाने त्वरित स्विकारावे,भारत सरकार शिष्यवृत्ती ची रक्कम त्वरित वितरीत करण्या यावी,डां.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र बार्टी मार्फत राज्यातील 100 संशोधक विद्यार्थ्यांना पोस्ट डाँक्टरेट ची फेलोशिफ सुरु करण्यात यावी.

या मागण्या 14 आगस्ट 2021 पर्यत पुर्ण झाल्या नाही तर आम्ही 15 आगस्ट 2021 पासून समाजकल्याण कार्यालय,नांदेडच्या समोर अमरण उपोषणास बसणार असल्याचे समाजकल्याण सहाय्यक आयुक्त यांच्यांशी चर्चा करून विद्यार्थी नेत्यांनी निवेदन दिले आहे यावर नसोसवायएफ राज्य प्रवक्ता प्रा. सतिश वागरे, जिल्हाध्यक्ष धम्मपाल वाढवे मनोहर सोनकांबळे, रुपेश सूर्यवांशी, शुभम दिग्रस्कर, अनुपम सोनाळे, डॉ. प्रवीण कुमार सावंत आदींनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.