Tokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास; बलाढ्य ऑस्ट्रेलियाला धूळ चारत सेमी फायनल मध्ये प्रवेश…

716

टोकयो, 2 ऑगस्ट : काल ऑलिम्पिक इतिहासात तब्बल 49 वर्षांनी भारतीय पुरुषांच्या हॉकी टीमनं (Indian men hockey team) सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. आज भारतीय महिला टीमने ऑलिम्पिक स्पर्धेत तीन वेळा गोल्ड मेडल जिंकणाऱ्या बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 1-0 ने पराभव करून इतिहास रचला आहे. ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच भारतीय महिला हॉकी टीमने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही टीमला एकही गोल करता आला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय टीमनं वर्चस्व गाजवलं. गुरुजीत कौरनं (Gurjit Kaur) 22 मिनिटाला गोल करत भारतीय टीमला आघाडी मिळवून दिली.

विशेष म्हणजे गुरुजीतनं टीमला मिळालेल्या पहिल्याच पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. गुरुजीतचा हा ऑलिम्पिकमधील पहिलाच गोल आहे. या गोलमुळे भारतानं पहिल्या हाफमध्ये 1-0 नं आघाडी घेतली.